नवी दिल्ली: बुधवार म्हणजे ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला सुरुवात होत आहे. संपूर्ण देशात घरोघरी श्री गणेशाचे आगमन होईल. १० दिवसांचा हा उत्सव अनंत चतुर्दशी रोजी संपेल. या वर्षी ९ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव असेल. गेल्या दोन वर्षात करोनाच्या निर्बंधामुळे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करता आला नाही. पण या वर्षी निर्बंध काढून टाकण्यात आल्याने उत्सव जोरदार साजरा करण्याची तयारी झाली आहे.

गणेश उत्सवासाठी बुधवारी देशातील अनेक राज्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. काही राज्यात बँकांना देखील सुट्टी (bank holiday ) देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकने दिलेल्या माहितीनुसार देशातील सात राज्यात बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. अन्य राज्यात बँकांचे काम नियमीत वेळेनुसार होणार आहे.

वाचा- गौतम अदानींच्या नावे नवा विक्रम; या व्यक्तींना मागे टाकत जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर

कोणत्या राज्यात बँकांना सुट्टी

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्र या राज्याती बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. अन्य सर्व राज्यात बँकांचे काम सुरूच असेल.

वाचा- तुमच्याकडे तर नाही ना बेनामी संपत्ती? जाणून घ्या कायदा काय, दोषी आढळल्यास…

RBIच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये सप्टेंबर २०२२मध्ये शनिवार आणि रविवार सोडून ७ बॅक सुट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. वेगवेगळ्या राज्यात ११ सुट्ट्या घेता येतील. या महिन्यात ओणम सणासाठी सर्वाधिक सुट्ट्या केरळमध्ये दिल्या जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here