नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड येत्या काही दिवसांमध्ये पार पडणार आहे. राहुल गांधी यांनी अद्याप अध्यक्षपद स्वीकारण्यास संमती दिलेली नाही. त्यामुळं काँग्रेसचा अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती होणार अशा चर्चा सुरु आहेत. राजस्थानचे मुख्यंत्री अशोक गेहलोत यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. मात्र, आज केरळमधील काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे. आनंद शर्मा आणि पृ्थ्वीराज चव्हाण आज काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या गुलाम नबी आझाद यांना भेटण्यासाठी गेले होते.

शशी थरुर कोण आहेत?

शशी थरुर काँग्रेसचे केरळमधून खासदार आहेत. आतापर्यंत ते तीन वेळा खासदार राहिले आहेत. लेखक, राजकीय नेता आणि आंतरराष्ट्रीय राजदूत म्हणून काम पाहिलेले नेते अशी त्यांची ओळख आहे. थरुर सध्या तिरुवनंतरपुरम येथून खासदार आहेत. ते काँग्रेसची अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत.

Ganesh Chaturthi 2022: उद्या गणेश चतुर्थी निमित्त बँकांना सुट्टी आहे का? येथे चेक करा

नरेंद्र मोदींपूर्वी सोशल मीडियाचे किंग

गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप करत काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला. राहुल गांधी देखील अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यामुळं शशी थरुर यांचं नाव चर्चेत आलं आहे. थरुर हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. २०१३ पर्यंत भारतातील सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेंत्यांमध्ये ते पहिल्या स्थानावर होते. मात्र, नरेंद्र मोदी यांची २०१४ मध्ये सत्ता आली आणि हे चित्र पालटलं.
शशी थरुर हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसला लोकसभेत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. राहुल गांधी यांनी त्यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. शशी थरुर यांनी पक्षाच्या पराभवाची जबाबदारी एकट्या राहुल गांधी यांची नसून सर्वांची असल्याचं ते म्हणाले होते. राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती, असं ते म्हणाले. शशी थरुरु यांनी भारताचा इतिहास, संस्कृती, चित्रपट, राजकारण, परराष्ट्र धोरणा याबाबत २३ पुस्तकांचं लेखन केलं आहे.

औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाने शिंदे सरकारला झटका, एकनाथ खडसे बोलले…

पृथ्वीराज चव्हाण गुलाम नबी आझादांच्या भेटीला

शशी थरुरु यांच्यासोबत महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव देखील चर्चेत असल्याची माहिती आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या गुलाम नबी आझाद यांच्या भेटीसाठी जी-२३ गटातील नेते पृथ्वीराज चव्हाण, भूपिंदर हुड्डा आणि आनंद शर्मा पोहोचले होते. राहुल गांधी यांच्यावर टीका करुन गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

विशेष बाब म्हणजे शशी थरुर हे देखील जी २३ गटातील नेत्यांमध्ये सहभागी होते. दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये ६४ नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अधिवेशनात प्रश्न का विचारले नाही? शहाजीबापू पाटलांनी पत्रकारांपुढं कारणांचा पाढा वाचला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here