मुंबई: व्हिडीओ फोन कॉलिंग सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी मालाडमध्ये धाड टाकली. या कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या हाती वेगळीच माहिती लागली. ज्या ठिकाणी धाड टाकली, तिथे पॉर्न शूटिंग रॅकेट सुरू असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे क्राईम ब्रांचच्या युनिट ११ नं सोमवारी मालाडमधील एका कॉल सेंटरवर धाड टाकली आणि १२ मुलींची सुटका केली. या मुली व्हिडीओ फोन सेक्स रॅकेटचा भाग होत्या.

एमपीडीडब्ल्यू कायदा २०१६ च्या अंतर्गत पोलिसांनी सी-लिंक मीडियाचा सर्वेसर्वा आणि जसवंती बिझनेस केंद्राचे मनोरंजन अधिकाऱ्याला अटक केली. कॉल सेंटरवर धाड टाकून १२ मुलींची सुटका केल्याची आणि कॉल सेंटरचा मालक ब्रिजेश शर्माला अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलींना क्युबिकल्स देण्यात आली होती. डेटिंग ऍपचं सदस्यत्व घेतलेल्यांशी या मुली सेक्स चॅट आणि कॉल करायच्या.
देवपूजेत व्यत्यय आणल्यानं पत्नी, तीन मुली आणि वृद्ध आईची हत्या; परिसरात खळबळ
कॉल सेंटरची झडती घेतल्यानंतर पोलिसांना तिथे पॉर्न साहित्य सापडलं. ‘आम्हाला तिथे कॅमेरा, बेडरुम पॉर्न व्हिडीओज सापडले. त्यांचं चित्रीकरण तिथेच करण्यात आलं होतं. त्यामध्ये काम केलेल्यांचा शोध सुरू आहे,’ अशी माहिती निशाणदार यांनी दिली.
कोणाकडून तरी पैसे घ्यायली गेली अन् नदीकिनारी मृतावस्थेत सापडली; गायिकेच्या हत्येचा संशय
मुंबईत पहिल्यांदाच व्हिडीओ कॉलिंग सेक्स रॅकेट उघडकीस आल्याचं निशाणदार यांनी सांगितलं. कॉल सेंटरच्या आडून व्हिडीओ सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची घटना दिल्ली, आगरताळा, पश्चिम बंगाल आणि देशाच्या इतर भागांमधून याआधी उघडकीस आल्या आहेत. ब्लॅकमेलिंग करायचं आणि पैसे वसूल करण्याची कामं या रॅकेटकडून केली जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here