Mumbai Ganeshotsav 2022: आजपासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात झालीये. त्यातच लालबागचा राजा म्हटलं की गर्दी ही आलीच. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच मोठ्या संख्येने भाविक राजाच्या दर्शनासाठी येत असतात. याच दरम्यान आज एक अप्रिय घटना घडली. लालबागच्या राजाच्या दरबारात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. एक महिला आणि काही महिला सुरक्षारक्षकांमध्ये हा वाद झाला.

हायलाइट्स:
- गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वाद
- लालबागच्या राजाच्या दरबारात तणाव
- भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्या वाद
लालबागच्या राजाच्या दरबारात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. मुखदर्शनाच्या रांगेत असलेली एक महिला आणि काही महिला सुरक्षारक्षकांमध्ये हा वाद झाला. यावेळी भाविक महिलेने महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केल्याचंही पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राजाच्या दरबारात काही काळ भक्तीमय नाही तर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.
लालबागच्या राजाच्या चरणी भक्त नतमस्तक
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.