मुंबई: बरेचसे क्रिकेट खेळाडू भारतीय देशाचे चाहते आहेत. भारतीय संस्कृती, सणवार, परंपरा या परदेशी खेळाडूंना फार आवडतात. आयपीएलच्या आणि क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने या खेळाडूंना भारताला जवळून पाहता येते. तर असाच एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे जो भारताचा खूप मोठा चाहता आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज हा भारताचा मोठा चाहता आहे. भारतातील सण समारंभ असो किंवा सिनेमाबाबतच्या काही घडामोडी वॉर्नर कायमच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो पोस्ट करत भारतीय चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोवर थोड्याच कालावधीत अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याचे आभार मानले आहेत.

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

डेव्हिड वॉर्नर भारतात फार प्रसिद्ध आहे. भारतातील लोकप्रिय आयपीएल लीगमध्ये बराच काळ त्याने सनरायजर्स हैदराबाद या संघाचे नेतृत्त्व केले. आयपीएलच्या मागच्या हंगामात दिल्लीच्या संघाने त्याला आपल्या संघात घेतले. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे त्याने सर्वांची मने जिंकली आहेतच, पण त्याच्या या इंस्टाग्राम पोस्टमुळे सगळे त्याची वाहवा करत आहेत.

वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या पिवळ्या जर्सीमध्ये हात जोडून उभा आहे आणि त्याच्या मागील बाजूस गणपतीचा एक सुंदर एडिट केलेला फोटो आहे. त्या फोटोसाठी त्याने खाली कॅप्शन मध्ये लिहिले आहे, “माझ्या सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या आनंदमय शुभेच्छा!”

भारत दुसरे घर तर भारतीय चित्रपटांचा चाहता

“भारत माझे दुसरे घर आहे आणि हैदराबाद माझे आवडते ठिकाण आहे.”, असं डेव्हिड एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाला होता. इतकेच नव्हे तर तो आणि त्याची लहान मुलगी हैदराबादमध्ये ऑटोरिक्षामधून फिरत होते.
डेव्हिडचा पुष्पा स्टाईल व्हिडिओ आपण सर्वांनीच पाहिला आहे. त्याने त्याच्या सोशल मिडीयावरून या चित्रपटाचे अनेक व्हीडिओ, गाणी शेयर केली होती, तर काही दिवसांपूर्वी पुष्पा चित्रपटाच्या ट्रेंडिंग गाण्यावर हुक स्टेपचा व्हिडिओ देखील शेयर केला. त्यानंतर अक्षय कुमारच्या बच्चन पांडे या चित्रपटासंबंधित रिल्स देखील त्याने तयार केल्या. बच्चन पांडे चित्रपटातील या गाण्याच्या रिलवर त्याने अक्षय कुमारला टॅग देखील केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here