मुंबई: नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्याबद्दल लोकांना कुतूहल वाटू लागलं. मोदी काय खातात, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट कोण सांभाळतं, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. पंतप्रधान मोदींबद्दल, त्यांच्या जेवणाच्या खर्चाविषयी, त्यांच्या जेवणाच्या सवयींविषयाचे काही प्रश्न माहिती अधिकार अर्जातून विचारण्यात आले होते. त्या अर्जाला केंद्रीय माहिती अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या जेवणावर होणाऱ्या खर्चाबद्दल आरटीआयमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं आहे. मोदी त्यांच्या जेवणाचा खर्च स्वत:च उचलतात. त्यांच्या जेवणावर सरकार कोणताही खर्च करत नाही, असं उत्तर आरटीआयमधून मिळालं. पंतप्रधान मोदींना गुजराती जेवण आवडतं. त्यांना आचारी बद्री मीणा यांनी केलेला स्वयंपाक आवडतो. बाजरीची रोटी आणि खिचडी मोदींना सर्वाधिक आवडते.
रुग्णाला घेऊन ऍम्बुलन्स हॉस्पिटलच्या दारात, पण अर्धा तास दारच उघडलं नाही; अनर्थ घडला
एका आरटीआयमधून मोदींनी घेतलेल्या सुट्ट्यांची माहिती मागण्यात आली होती. त्यावर मोदींनी आतापर्यंत एकही सुट्टी घेतली नसल्याची माहिती पीएमओनं दिली. मोदी किती तास काम करतात, असा प्रश्न एका आरटीआयमधून विचारण्यात आला. त्यावर मोदी प्रत्येक वेळी ड्युटीवरच असतात, असं उत्तर पीएमओनं दिलं. पीएमओमधील इंटरनेटचा स्पीड किती असा प्रश्न २०१५ मध्ये एका आरटीआयमधून विचारला गेला. त्याला ३४ एमबीपीएस असं उत्तर देण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here