मुंबई: अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tmahankar won Filmfare Award 2022) नवनव्या यशाच्या पायऱ्या चढताना दिसते आहे. मराठी चित्रपट, वेब सीरिज यांसह अभिनेत्रीचा डंका हिंदी सिनेमांमध्येही पाहायला मिळतो. अभिनेत्रीने ‘मिमी’ या हिंदी सिनेमात साकारलेल्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. या चित्रपटातील सईच्या ‘शमा’ या भूमिकेने विविध पुरस्कारही जिंकले. आता सईला या भूमिकेसाठी सर्वोत्त्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award 2022) मिळाला आहे. ३० ऑगस्ट रोजी पार पडलेल्या फिल्मफेअरच्या दिमाखदार सोहळ्यात अभिनेत्रीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हे वाचा-विकी-कतरिनाचा किस होतोय व्हायरल; लग्नाबाबत पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री

फिल्मफेअरचा मानाचा पुरस्कार जिंकल्यानंतर सर्वच स्तरातून सईचे कौतुक होत आहे. पण सईसाठी एका खास व्यक्तीनेही पोस्ट केली आहे. ही व्यक्ती म्हणजे अनिश जोग. निर्माता असणाऱ्या अनिशला सई डेट करत आहे. त्यांनी एकमेकांविषयी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरुनच त्यांच्या रिलेशनशिपचा अंदाज बांधण्यात आला. दरम्यान एवढा मोठा पुरस्कार जिंकल्यानंतर अनिशने सईसाठी खास पोस्ट केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी आणि पोस्ट शेअर करत सईसाठी आनंद व्यक्त केला आहे.

हे वाचा-सही रे सई! IIFA नंतर ‘फिल्मफेअर’वरही सई ताम्हणकरचं नाव, भाव खाऊन गेला अभिनेत्रीचा हटके लूक

त्याने शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये सईला ‘राणी’ म्हटलं आहे. तो पुढे लिहितो की, ‘संपूर्ण जगाने लक्ष द्या, ती जग जिंकणार आहे’. त्याने शेअर केलेल्या स्टोरीचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Anish Joag

अनिशने सईसाठी खास पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने सईचा ट्रॉफीसोबत असणारा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अनिशने असं लिहिलं आहे की, ‘तिने यासाठी कठोर मेहनत घेतली. तिने दीर्घकाळापासून याची स्वप्न पाहिली आहे. ती सर्वात उत्तम आहे. ती इथे अशीच असणार आहे. ती हे तिचं करून घेणार आहे आणि ती या सर्वासाठी पात्र आहे.’


अनिशच्या या पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शवणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. सईचं कौतुक करताना अनिशप्रमाणेच तिचे सहकलाकार आणि चाहतेही थकत नाही आहेत. सईने शेअर केलेल्या पोस्टवरही अभिनंदनाच्या शेकडो कमेंट्स आल्या आहेत.


सईला हा पुरस्कार ‘मिमी’ या सिनेमातील तिच्या ‘शमा’च्या (Sai Tamhankar Mimi) भूमिकेसाठी मिळाला. सईने मिमी या सिनेमात क्रिती सेनॉन (Kriti Sanon Mimi) अर्थात मिमीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. तिच्यासह पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची देखील या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here