हे वाचा-अटक झाल्यानंतर काहीच तासात केआरके रुग्णालयात, नेमकं काय घडलं?
काय म्हटलं आहे या व्हायरल पोस्टमध्ये?
या पोस्टमध्ये अभिनेता यशचा एक फोटो शेअर करण्यात आला असून त्यावर असं कॅप्शन दिलं आहे की, ‘साऊथचा सुपरस्टार अभिनेता यश कुमार आज श्रीरामजींच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचला होता आणि राम मंदिराच्या निर्मितीसाठी त्याने ५० कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा केली. या लोकांसाठी वाढणाऱ्या प्रेमाचे हेदेखील एक कारण आहे.’
सोशल मीडियावर हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. सध्या बॉलिवूड हिरोंना बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सुरू असताना व्हायरल होणार हा फोटो चर्चेचा विषय ठरतोय. ट्विटरसह फेसबुकवरही हा फोटो व्हायरल होत आहे.

काय आहे व्हायरल फोटोमागील सत्य?
या फोटोचे सत्य तपासल्यानंतर वेगळीच माहिती समोर आली आहे. हा फोटो अलीकडेच काढलेला नसून एप्रिल २०२२ मधील आहे. मीडिया रिपोर्टनुसार ११ एप्रिल रोजीचा हा फोटो असून तो अयोध्येच्या राम मंदिरातील नसून आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिर परिसरातील आहे. केजीएफ २ च्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्याने मंदिराला भेट दिली होती, तेव्हा हा फोटो काढण्यात आला होता. मात्र आता या फोटोचा वापर चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला जातोय. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केलं जात आहे.
हे वाचा-ती जग जिंकणार आहे… सई ताम्हणकरचं कौतुक करताना थकत नाहीये तिचा बॉयफ्रेंड
दरम्यान अलीकडच्या काळात यशने राम मंदिरासाठी कोणताही निधी दिल्याचेही अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. त्यामुळे या सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा आहे.