लातूर : गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला लातूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. येथील एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भागवत सुनील बडे (वय २१) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यात असणाऱ्या देवदहिफळ या गावचा रहिवासी आहे. भागवतचे आई वडील शेतकरी असून घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याचं सांगण्यात येत आहे.

चार दिवसापूर्वी एमबीबीएसच्या सत्राची परीक्षा दिल्यानंतर सुट्ट्या असल्याने तो आपल्या मूळ गावी गेला होता. काल ३० ऑगस्ट रोजी तो लातूरला परत आला. लातूरमध्ये तो भाड्याच्या रुममध्ये राहत होता. गणेश उत्सवाच्या पूर्व संध्येला भागवतने रुममध्येच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही बाब त्याच्या सोबत राहणाऱ्या रुम पार्टनरच्या निदर्शनास येताच त्याने भागवतला उपचारासाठी एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी भागवतला तपासून मृत घोषित केले.

ते शिंदे गटाचे जॉनी लिव्हर, अमोल मिटकरींचं शहाजी पाटलांना जोरदार प्रत्युत्तर
भागवतने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप समजू शकले नाही. एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच तणाव निर्माण होत असतो. त्यातूनच भागवतने आत्महत्या केली असावी का? अशी संशयास्पद चर्चा महाविद्यालय परिसरात सुरू होती. पण भागवतच्या आत्महत्येमागे नेमके कोणते कारण आहे याची ठोस माहिती समोर येऊ शकली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास विवेकानंद चौक पोलीस करत आहेत.

अमेरिकेचा मोठा निर्णय, ४०० चिनूक हेलिकॉप्टर्सचा वापर बंद, भारतीय हवाई दल अलर्ट, जाणून घ्या कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here