ती जग जिंकणार आहे… सई ताम्हणकरचं कौतुक करताना थकत नाहीये तिचा बॉयफ्रेंड
अभिनेता गश्मीर महाजनीनं फेसबुकवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात गणपतीची पूजा झाल्यावर तो आपल्या छोट्या मुलाला सगळ्यांना नमस्कार करायला सांगतो. मुलगाही आजी, आई आणि शेवटी गश्मीरला नमस्कार करतो. अगदी स्वप्निल जोशीही आपल्या मुलांना असेच संस्कार देतोय. स्वप्निल आणि त्याचं कुटुंब गणपतीची आरती म्हणतंय. यात सगळ्या महत्त्वाच्या आरत्या, मंत्रपुष्पांजली म्हटली आहे. नंतर स्वप्निल मायरा आणि राघव यांना बाप्पाला वाकून नमस्कार करायला सांगतोय. मुलंही तसं करतात आणि मग घरातल्या सर्व मोठ्यांना वाकून नमस्कार करतात.
अभिनेता संदीप पाठकनंही आपल्या मुलांबरोबर घरी गणपती आणला आहे. त्याच्या मुलानंच मूर्ती हातात घेतलीय. अभिनेत्यानं हा व्हिडिओ शेअर केला आहे.
संजना फेम रुपाली भोसलेनंही भावाबरोबर स्वत: उचलून गणपती घरी आणलाय. ती लिहिते, ‘तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्ताच्या कानाइतका विशाल असावा, अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात,आयुष्य त्याच्या सोंडेइतकं लांब असावं आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत.
अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनीही घरच्या गणपतीचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, तुम्ही हमका हो संभाले,तुम्ही हमरे रखवाले, तुमरे बिन हमरा कौनो नाहीं. अभिनेत्री प्राजक्ता माळीनंही आपल्या भाचीबरोबर बाप्पाचा फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहरेनंही एक व्हिडिओ शेअर केला आहे. अर्थात तो बाप्पा येण्याआधी ती सजावट करताना दिसतेय. दिग्दर्शक रवी जाधव यांनी घरी स्वत:च गणेशाची मूर्ती तयार केली आहे. ते म्हणाले होते’ आपला बाप्पा आपणच घडवण्याइतका दुसरा आनंद नाही!’ गायक राहुल देशपांडेनीही स्वत: हातानं मूर्ती बनवली आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरूनं हातात गणपतीची मूर्ती घेतली आहे. नंतर ती तिची पूजा करतेय. रिंकू स्वत: ढोल वाजवताना दिसत आहे. नऊवारी साडीतल्या रिंकूचं रूप खुलून दिसत आहे. तिनं भरपूर दागिनेही घातले आहेत. रिंकूचे हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झालेत.
अभिनेता सुबोध भावेच्या घरी दर वर्षीप्रमाणे बाप्पांचं आगमन झालं आहे. सकाळीच पूजाअर्चा झाल्यावर सुबोधनं सोशल मीडियावर गणपती आणि त्याच्या भोवती केलेली आरास यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही पूर्ण सजावट सुबोधच्या मुलांनी केली आहे.
KGF सुपरस्टार यशने अयोध्येतील राम मंदिरासाठी दिले ५० कोटी?
वॉकर घेऊन बाप्पाच्या स्वागताला घराबाहेर आली शिल्पा शेट्टी