shivsena omraje nimbalkar, शिवसेनेच्या माजी खासदाराने शिंदे गटात प्रवेश करताच ओमराजे संतापले; दिला आक्रमक इशारा – mp omraj nimbalkar gave an aggressive warning after former mp ravindra gaikwad joined the eknath shinde group
उस्मानाबाद : जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटात प्रवेश केला. गायकवाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर उस्मानाबादचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार टीका करत आक्रमक इशारा दिला आहे.
‘आमदार आणि खासदार हे शिवसैनिकांमुळे होत असतात. मात्र स्वार्थ दिसला की हेच लोकप्रतिनिधी दुसरीकडे उडी मारतात. या प्रकरणामुळे सच्चा शिवसैनिक दुखावला गेला आहे. मतदारसंघातील नागरिक बोलत नाहीत, पण निवडणुकीत मताच्या माध्यमातून ते आपला रोष व्यक्त करतील,’ अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. Sonia Gandhi Mother Passed Away : सोनिया गांधी यांना मातृशोक, पाऊलो मायनो यांचं दीर्घ आजारानं निधन
‘२०१९ मध्ये अशीच परिस्थिती निर्माण केली होती. पण शिवसैनिकांनी शिवसेनेशी प्रतारणा केली नाही. मला उमरगा लोहारा मतदारसंघाने २२ हजार मतांची आघाडी दिली. उमरगा मतदारसंघात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक आहेत. त्यामुळे रविंद्र गायकवाड गेले असले तरी शिवसैनिक हे शिवसेनेतच आहेत,’ असंही ओमराजेंनी म्हटलं आहे.
रविंद्र गायकवाड यांच्या शिंदे गटातील प्रवेशामागे नेमकं कारण काय?
माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी विधानपरिषद डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याचं बोललं जात आहे. राज्यपालांकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या १२ आमदारांच्या यादीत रविंद्र गायकवाड यांचे चिरंजीव किरण गायकवाड यांची वर्णी लागते की स्वत: रविंद्र गायकवाड हे या जागेसाठी प्रयत्न करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.