अहमदनगर :भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असा विरोधकांचा दावा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. विरोधक आता दुःखी चेहरे घेऊन फिरत आहेत, हे मी पाहतोय,’ अशा शब्दात विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार आले. मात्र अनेक माजी मंत्र्यांकडे अद्यापही सरकारी सुरक्षेचा लवाजमा कायम आहे. याबद्दल प्रसार माध्यमांनी विचारले असता विखे पाटील म्हणाले की, सरकार गेल्यानंतर सुरक्षा परत करणे हा प्रत्येकाच्या नैतिकतेचा प्रश्न आहे. आमचे सरकार एका दिवसात फतवा काढीन आणि ही सुरक्षा परत घेईल. मात्र पुन्हा हेच लोक सरकारवर द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप करतील. काही मंडळी आजही मागच्या सरकारच्या काळातील लवाजमा घेऊन फिरत आहेत. नैतिक मूल्ये शिल्लक असतील तर त्यांनी तो परत केला पाहिजे,’ असा टोलाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्र्यांना लगावला आहे.

यंदा करोनासंकट टळले, बाप्पा करणार ५०० किमीचा प्रवास, गोदावरी एक्स्प्रेसमध्ये श्रींची प्रतिष्ठापना

‘महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तोंडी लोकशाहीची भाषा शोभत नाही’

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला तर लोकशाही संपून जाईल अशी भाषा विरोधक करत आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तोंडी लोकशाहीची भाषा शोभत नाही. कारण शिंदे गटाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणार नसाल तर कोणत्या लोकशाहीची भाषा करता? असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाच्या निर्णयाचा प्रत्येकाने आदर करायला शिकलं पाहिजे, असा सल्ला विखे पाटलांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.

‘उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते मुख्यमंत्री शिंदेंनी करून दाखवलं’; रामदास कदमांनी निर्णयांची यादीच वाचली

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी पत्नी शालिनी विखे यांच्या सोबत त्यांनी गणरायाची पूजा केली. राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत राज्य अधिक उत्तम चालावे यासाठी गणरायाला साकडं घातल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here