नागपूर : मोठा ताजबाग परिसरातून महिलेने १३ आणि १४ वर्षीय दोन मुलींचे अपहरण केले. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आरोपी सरगम खान हिला ताब्यात घेतलं असून तिच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

उर्ससाठी कामठी व उत्तर प्रदेशातील दोन मुली नातेवाइकांसह मोठा ताजबाग येथे आल्या. मोठा ताजबाग परिसरात भाविकांना राहण्यासाठी मंडप टाकण्यात आला आहे. २९ ऑगस्टला दोन मुली बेपत्ता झाल्या. त्यांच्या नातेवाइकांनी शोध घेतला. मात्र त्या दोघीही आढळल्या नाहीत. सरगमही बेपत्ता होती. याप्रकरणी मुलींच्या नातेवाइकांनी सक्करदरा पोलिसांत तक्रार दिली.

खैरे म्हणाल्यावर सरकार पडणार आहे का? शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरेंचा थेट सवाल

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केल्यानंतर १४ वर्षांची मुलगी नागपुरातच आढळली. पोलिसांनी सरगमच्या मोबाइलचे लोकेशन तपासले असता ते रायपूर येथे असल्याचे आढळले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुधवारी नागपूर पोलिसांनी रायपूर येथून सरगम व गायब असलेल्या आणखी एका मुलीला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, दोघींना घेऊन पोलीस पथक गुरुवारी नागपुरात पोहोचणार आहे. सरगमने मुलींचे अपहरण कशासाठी गेले हे तिच्या चौकशीनंतरच उघडकीस येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here