यावेळी विजय साळवी यांनी ५९ वर्षे जुनं मंडळ असताना या मंडळावर पोलिसांच्या फौज फाट्यासह रात्री कारवाई करण्यात आली. या कारवाईचा निषेध करण्यासाठी या मंडळातर्फे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होते.
पोलिसांनी देखाव्यावर केलेल्या या कारवाईनंतर या प्रकारावर शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी यांनी निषेध व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, विजय तरुण मंडळाचे हे ५९ वे वर्ष आहे. इतके जुने मंडळ असतानाही या मंडळावर अतिरेकी कारवाई करण्यात आली. मध्यरात्रीनंतर ३ वाजत ५०० पोलीस दरोडेखोर येतात तसे आले. कारवाई करून सजावट जप्त करण्यात आली. याच्या निषेधार्थ कल्याण शहर शिवसेना शाखेने महाआरतीचे आयोजन केले.
विजय साळवी प्रतिक्रिया देताना पुढे म्हणाले की, आम्ही दाखल केलेल्या उद्या १० वाजता आमच्या याचिकेवर सुनावणी आहे. याचिकेच्या सुनावणीदरम्यान आमच्या बाजूने कौल लागेल असे वाटते आणि तो लागणारच आहे. घटनेने आम्हाला अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार हिरावून घेतले गेले तर ब्रिटिश आणि आपल्यात काही फरक राहणार नाही, हे सरकार जेवढी पापं करेल तेवढे त्यांच्या पापाचा घडा भरणार हे निश्चित.