पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात बुधवारी मोठी पडझड पाहायला मिळाली. खनिज तेलाचे दर प्रति बॅरल ९० डॉलरच्या खाली जाऊ शकतात. वेस्ट टेक्सस इंटरमीडिएट खनिज तेलाचा दर ८९.५२ डॉलरपर्यंत घसरला आहे.

 

petrol pump
मुंबई: पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात बुधवारी मोठी पडझड पाहायला मिळाली. खनिज तेलाचे दर प्रति बॅरल ९० डॉलरच्या खाली जाऊ शकतात. वेस्ट टेक्सस इंटरमीडिएट खनिज तेलाचा दर ८९.५२ डॉलरपर्यंत घसरला आहे. तर बेंट क्रूडवर खनिज तेलाचा दर ९६ डॉलरच्या आसपास आहे. ऑगस्टमध्ये खनिज तेलाच्या दरात १० टक्क्यांची घट पाहायला मिळाली होती.

युरोपमध्ये ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे मंदीची भीती व्यक्त होत आहे. चीनच्या अनेक शहरांत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागला आहे. त्यामुळे इंधनाची मागणी कमी होऊ शकते. या सगळ्या घडामोडींचा परिणाम खनिज तेलाच्या दरांवर पाहायला मिळत आहे. खनिज तेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
अदानी एका दिवसाला कमवतात एवढे पैसे, ८० कोटी गरिबांच्या पोटचा प्रश्न सुटेल
खनिज तेलाच्या दरात झालेल्या पडझडीचा फायदा भारताला मिळू शकतो. भारताची खनिज तेलाची गरज मोठी आहे. भारत एकूण वापराच्या ८० टक्के खनिज तेल आयात करतो. त्यामुळे बरंचसं परकीय चलन खर्च होतं. तेलाचे दर घसरत राहिल्यास त्याचा मोठा फायदा भारताला होईल. आयातीवरील खर्चात मोठी घट होईल.
चीनमध्ये हाहाकार, बँकांमध्ये ४६ हजार कोटींचा महाघोटाळा, तब्बल २३४ जणांवर अटकेची कारवाई
खनिज तेलाच्या दरात मोठी घट होण्याचा अंदाज मूडीज ऍनालिटिक्सपासून सिटीग्रुपपर्यंत अनेक कंपन्यांनी वर्तवला आहे. २०२२ च्या अखेरपर्यंत खनिज तेलाचे दर ६५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरतील, असं भाकित सिटीग्रुपनं वर्तवलं आहे. २०२३ च्या अखेरपर्यंत खनिज तेलाचे दर ४५ डॉलरपर्यंत येऊ शकतात. यामुळे भारतातील सरकारी तेल कंपन्यांचं नुकसान कमी होऊ शकेल. डॉलरच्या मागणीत घट झाल्यानं रुपया मजबूत होईल. सर्वसामान्यांना इंधन दरातून दिलासा मिळू शकेल.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here