माझ्या जीवनात अनेक प्रकारची संकटं आली. कोविडच संकट आलं, राजकीय संकट आलं. पण जोपर्यंत माझं नातं माझ्या मातीतल्या माय माऊलींशी, वडिलधाऱ्यांशी आणि माझ्या भावांशी जुळलेलं आहे, तोपर्यंत मी या जगात कुणालाही घाबरत नाही, असे धनंजय मुंडे यांनी ठणकावून सांगितले.आपल्या भाषणाचा शेवट धनंजय मुंडे यांनी शेरोशायरीने केला. “राह में खतरे कितने भी हो, लेकिन ठहरता कौन है… मौत कल आती है, आज आ जाए… अरे डरता कौन है? तेरे लष्कर के मुकाबले मैं अकेला हूँ… मगर फैसला मैदान में होगा कि मरता कौन है?”, असे धनंजय मुंडे यांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
गेल्या तीन वर्षात करोना विषाणूच्या संसर्गामुळे गणपती उत्सव साजरा करता आला नाही. पण यावेळी तुम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात. आजपासून पुढील दहा दिवस नाथ प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आणि प्रभू वैद्यनाथाच्या नगरीला गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्या, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
करुणा शर्मांची फसवणूक, आरोपी धनंजय मुंडेंच्या ओळखीचा?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांची संगमनेरमधील तिघांनी ३० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याविरोधात करुणा मुंडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नवीन पक्ष काढण्यासाठी पैसे हवेत तर आमच्या बांधकाम कंपनीत गुंतवणूक करा, चांगला नफा मिळवून देतो. कंपनीचे संचालकही करतो, शिवाय आम्हीही तुमच्या पक्षात सामील होतो, असं सांगून आरोपींनी फसवणूक केल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. आरोपी हे धनंजय मुंडे यांच्या चांगल्या परिचयाचे असल्याने आपण त्यांच्यावर विश्वास ठेवल्याचंही करुणा यांनी फिर्यादित म्हटलं आहे.