police rescues 6 cows from ambulance: गो तस्कर आता विविध शक्कल लढवून गुरांची तस्करी करण्याचे नवनवीन मार्ग अवलंबत आहे. आता तर गो तस्करांनी तर हद्दच केली. चक्क रुग्णवाहिकेमधूनच गुरांची तस्करी केल्याचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिसांनी उघड केले आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने वाघाडी येथे सापळा रचला होता. सकाळी सातच्या सुमारास पोलीस पथकाने एमपी ०९ एफए ४५९३ क्रमांकाची फोर्स कंपनीची रुग्णवाहिका थांबवून चौकशी केली असता रुग्णांच्या नावाने रुग्णवाहिकेमधून गुरांची वाहतूक होत असल्याचे धक्कादायक कृत्य उघडकीस आले. शिरपूर पोलिसांच्या पथकाने सदर रुग्णवाहिका ताब्यात घेत यामधून मधून ३६ हजार रुपये किमतीच्या ६ गायींची सुटका करून २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. चालक विजय पौलाद चव्हाण (वय २३ रा. महू ता. जि. इंदूर मध्य प्रदेश) यास अटक करण्यात आली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.