Maharashtra Politics | संभाजीराजे छत्रपती अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे कान टवकारले गेले आहेत. २०१४ साली राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर संभाजीराजे यांची राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून वर्णी लागली होती. त्यांचा कार्यकाळ अलीकडेच संपला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते.

हायलाइट्स:
- संभाजीराजे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर काय घडणार
- शिवसेनेने संभाजीराजे यांना पाठिंबा न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज
- देवेंद्र फडणवीस संभाजीराजे यांच्याबाबत नेमकी काय भूमिका घेणार
२०१४ साली राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर संभाजीराजे यांची राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून वर्णी लागली होती. त्यांचा कार्यकाळ अलीकडेच संपला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षांकडून पाठिंब्याची मागणी केली होती. परंतु, एकाही राजकीय पक्षाने त्यांना समर्थन दिले नव्हते. तर शिवसेनेने संभाजीराजे यांना आपल्या पक्षाच्या तिकीटावर राज्यसभा निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. याच निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची फाटाफूट होऊन संजय पवार यांचा पराभव झाला होता. हीच निवडणूक एकप्रकारे राज्यातील सत्तांतराची नांदी ठरली होती.
त्यामुळे आता संभाजीराजे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार का, हे पाहावे लागेल. राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने संभाजीराजे यांना पाठिंबा न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस संभाजीराजे यांच्याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
संभाजीराजेंच्या भूमिकेवर मराठा क्रांती मोर्चा नाराज
काही दिवसांपूर्वीच मुंबईत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासंदर्भात एक बैठक पार पडली होती. या बैठकीला संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हजर होते. मात्र, या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) चकार शब्दही काढण्यात आला नाही. बैठकीला उपस्थित असणाऱ्या संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मराठा समन्वयकांना तसे बजावले होते. त्यामुळे सरकारने संभाजीराजे छत्रपती यांनाही मॅनेज केल्याचे दिसत आहे, असा खळबळजनक आरोप मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.