assistant manager of a gurugram office suicides: कार्यालयातील सहकारी महिलेनं थेट चारित्र्यावर आरोप केल्यानं तणावाखाली असलेल्या एका सहव्यवस्थापकानं आत्महत्या केली आहे. त्याचं वय ४१ वर्षे होतं. महिलेच्या आरोपांनंतर सहव्यवस्थापकाची चौकशी सुरू झाली. त्यामुळे त्याला मानसिक त्रास होऊ लागला.

 

suicide 1
गुरुग्राम: कार्यालयातील सहकारी महिलेनं थेट चारित्र्यावर आरोप केल्यानं तणावाखाली असलेल्या एका सहव्यवस्थापकानं आत्महत्या केली आहे. त्याचं वय ४१ वर्षे होतं. महिलेच्या आरोपांनंतर सहव्यवस्थापकाची चौकशी सुरू झाली. त्यामुळे त्याला मानसिक त्रास होऊ लागला. कार्यालयातील बैठकांमध्ये त्याला अपमान सहन करावा लागला. या त्रासाला कंटाळून त्यानं टोकाचं पाऊल उचललं.

सहव्यवस्थापक अमित कुमार यांनी सुसाईड नोटमध्ये त्याच्या मनातील भावना लिहून ठेवल्या. ‘१३ वर्षांच्या नोकरीत कोणीही कधीच माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले नाहीत आणि आज अचानक असे आरोप? मी कधीच कोणाकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही,’ असं अमित कुमार यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे. ही सुसाईड नोट ५ पानांची आहे.
ड्युटीवर झोपला की संपला! वॉचमनवर हल्ले करणारा सीरियल किलर; ७२ तासांत ३ हत्या
अमित कुमार काम करत असलेली कंपनी आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी तणावाशी दोन हात करणारं सॉफ्टवेअर तयार करते. मात्र याच कंपनीत सहव्यवस्थापक असलेल्या अमित कुमार यांनी मंगळवारी गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याच्या मागे पत्नी आणि ५ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी पत्नीनं सेक्टर-९ ए पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
व्हिडीओ फोन कॉलिंग रॅकेट उद्ध्वस्त करायला गेले; मुंबई पोलिसांच्या हाती पॉर्न रॅकेट लागले
१० वर्षांपूर्वी अमित कुमार यांचा विवाह झाला. जवळपास दीड महिन्यांपूर्वी त्यांनी जुनी कंपनी सोडली आणि नव्या फार्मा कंपनीत रुजू झाले होते. आत्महत्या करण्याआधी मोबाईलवरून काही जणांना मेसेज केले होते, असा दावा त्यांच्या पत्नीनं केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here