आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. तो मालिकेच्या आगामी भागाचा आहे. त्यात अनिश आणि आशुतोष गप्पा मारतायत. अनिश आशुतोषला विचारतो, अरुंधती मॅडमला पहिलं कुठे भेटलात? लव्ह अॅट फर्स्ट साइट का? त्यावर आशुतोष म्हणतो, त्यावेळी मला तिच्याबद्दल जे वाटत होतं त्याला प्रेम म्हणायचं का हे माहीत नाही. पण काही तरी होतं तिच्यात.
दुसरीकडे अरुंधती आणि यशमध्येही बोलणं सुरू आहे. अरुंधती म्हणते, आशुतोषनं मला माणूस नाही गाणं माझ्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे, हे सांगितलं. त्यावर यश म्हणतो, त्यांच्या बरोबर खूप कम्फर्टेबल वाटतं. अरुंधती म्हणते, हो मलाही. यश विचारतो, मग कसला विचार करतेयस? यावर आता अरुंधती काय म्हणणार हे मालिकेतच कळेल.
आता याच समारंभातला पत्रकार परिषदेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्यात एक रिपोर्टर प्रश्न विचारतेय. ती म्हणते, यश देशमुख हा अरुंधती जोगळेकरांचा मुलगा. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. मग अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं जिथं असतील, तिथे इतरांनी प्रवेश का घ्यावा? यावर अरुंधती काही बोलणार, तर यशच बोलायला उभा राहतो. तो म्हणतो, होय मी एकाला मारण्याचा प्रयत्न केला.
सुलेखाताईंना अरुंधती आपली सून म्हणून हवी आहे. पण कांचनला ते अजिबातच मान्य नाही. अरुंधतीला बरं नसताना सुलेखाताई तिच्या घरी राहायला येतात. ते काही कांचनला आवडत नाही. आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात अरुंधतीच्या घरी सुलेखाताई, आशुतोष आणि अरुंधती बसून बोलतायत. अरुंधती म्हणते मी पोहे करते. तेव्हा सुलेखाताई तिला म्हणतात, अग तू बस मीच करते. इतक्यात दारात कांचन बॅग घेऊन उभी आहे. कांचन म्हणते, कोणीही काही करायला नको. आता मीच करते. अरुंधती माझी सून. तेव्हा मीच करायला हवं तिचं. तुम्ही कशा बाहेरच्या पडता.