मुंबई: भारतात अनेक दहशतवादी कारवाया घडवणारा दाऊद इब्राहिम नेमका कुठे लपला आहे, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. दाऊद आणि त्याचे साथीदार पाकिस्तानात लपल्याची चर्चा होत असते. दाऊदचा भाऊ इक्बालनं दाऊदचा ठावठिकाणा एनसीबीला सांगितला आहे.

जून २०२१ मध्ये दाऊदचा भाऊ इक्बालला अटक करण्यात आली. मुंबई एनसीबीनं ड्रग्स केसमध्ये त्याला बेड्या ठोकल्या. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी इक्बालची चौकशी केली. त्याला दाऊद, छोटा शकील, अनिस इब्राहिमचा ठावठिकाणा विचारण्यात आला. दाऊदसह छोटा शकील आणि अनिस पाकिस्तानात असल्याचं इक्बालनं सांगितलं.
ड्युटीवर झोपला की संपला! वॉचमनवर हल्ले करणारा सीरियल किलर; ७२ तासांत ३ हत्या
मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी जावेद चिकनासंदर्भातही इक्बालनं महत्त्वाची माहिती दिली. जावेद पाकिस्तानात ड्रग्जचं काम करतो. त्याला पाकिस्तानात अटक झाली होती. तो तुरुंगातही जाऊन आला आहे, असं इक्बालनं सांगितलं. याआधी दाऊदचा भाचा अलीशाह पारकरनं ईडी चौकशीत धक्कादायक माहिती दिली. दाऊद कराचीत वास्तव्यास आहे. माझ्या जन्माआधीच म्हणजेच १९८६ मध्ये त्यानं भारत सोडला आहे. दाऊद माझा मामा आहे आणि १९८६ पर्यंत तो डंबरवाला भवनाच्या चौथ्या मजल्यावर राहायचा, अशी माहिती पारकरनं ईडीला दिली होती.
व्हिडीओ फोन कॉलिंग रॅकेट उद्ध्वस्त करायला गेले; मुंबई पोलिसांच्या हाती पॉर्न रॅकेट लागले
दाऊद पाकिस्तानातील कराचीत असल्याचं मी अनेक नातेवाईकांकडून ऐकलं असल्याचं अलीशाहनं ईडी चौकशीत सांगितलं. ‘ते जेव्हा हिंदुस्तान सोडून गेले, तेव्हा मी जन्मालाही आलो नव्हतो. मी आणि माझं कुटुंब त्यांच्या संपर्कात नाही. कधी कधी ईद, दिवाळी किंवा अन्य सणांना माझा मामा दाऊद इब्राहिमची पत्नी महजबीन माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणींशी संपर्क साधते,’ अशी माहिती अलीशाहनं दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here