banner with eknath shindes photo in worli: आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बॅनर लागला आहे. श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कमानीवर शिंदेंचे फोटो आहेत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असा उल्लेख या फोटोंखाली आहे.

 

shinde banner in worli
मुंबई: शिवसेनेच्या ४० आमदारांसह एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीची साथ सोडली. राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार, अनेक पदाधिकारी त्यांच्या गटात गेले. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत अद्याप तरी शिंदेंना यश आलेलं नाही. या ठिकाणचे पदाधिकारी ठाकरेंसोबत आहेत. मात्र आता शिंदे गट वरळीत शिरकाव करत असल्याचं दिसत आहे.

आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बॅनर लागला आहे. श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कमानीवर शिंदेंचे फोटो आहेत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असा उल्लेख या फोटोंखाली आहे. या कमानीवर शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो आहेत.
पुण्यात मोठ्या राजकीय हालचाली, सुरेश कलमाडींच्या कार्यक्रमाला भाजपचे बडे नेते, सेकंड इनिंगची सुरुवात?
वरळी मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आदित्य ठाकरे विधानसभेत या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. या मतदारसंघात शिवसेनेचे एकूण तीन आमदार आहेत. त्यातील दोन जण विधानपरिषदेचे सदस्य आहेत. २०१४ मध्ये शिवसेनेचे सुनिल शिंदे या मतदारसंघातून विजयी झाले. मात्र २०१९ मध्ये त्यांनी आदित्य यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला. शिंदे यांना पक्षानं विधान परिषदेवर संधी दिली. २००९ मध्ये सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर वरळीतून बाजी मारली होती. ते गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आले. आता ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकरदेखील याच मतदारसंघात राहतात.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here