मुंबई : हिंदी सिनेमा विश्वातील आघाडीच्या गायकांच्या यादीमध्ये किशोर कुमार यांचा नावाचा आवर्जून समावेश केला जातो. ‘एक लडकी भीगी भागी सी’ आणि ‘फिर सुहानी शाम ढली’ यांसारखी सुंदर, अजरामर गाणी त्यांनी गायली आहेत. केवळ गाणीच नाही तर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये कामही केलं आहे. १३ ऑक्टोबर १९८७ रोजी किशोर कुमार यांचं हृदयविकारानं निधन झालं. किशोर कुमार यांची अमित कुमार आणि सुमित कुमार हे देखील संगीत विश्वाशी निगडीत आहेत. वडिलांचा वारसा हे दोघंही पुढं चालवत आहेत. दरम्यान किशोर कुमार यांच्या जुहूतील बंगल्याविषयी त्यांच्या मुलांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा-लाल सिंग चड्ढा आपटल्यानंतर आमिर मागतोय माफी, म्हणाला- चूक माणसांकडूनच होते

किशोर कुमार यांचा जुहू येथील बंगला भाड्यानं दिला जात आहे आणि हा बंगला क्रिकेट विश्वातील आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली हा घेत आहे. ई-टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार, किशोर कुमार (Kishore Kumar) यांचा मुंबईतील जु्हू इथला बंगला विराट कोहलीनं लीजवर घेतला आहे. या बंगल्यामध्ये तो हायग्रेड रेस्टॉरंट सुरू करणार आहे. रेस्टॉरंटचे काम जवळपास पूर्ण झालं आहे आणि येत्या काही महिन्यांत ते सुरू देखील होणार आहे.

kishore kumar bungalow

मुंबईतील किशोर कुमार यांचा बंगला

किशोर कुमार यांच्या मुलांनी दिला दुजोरा

या संदर्भात ई टाइम्सला किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितलं की, सुमित कुमार (किशोर कुमार आणि लीना चंदावरकर यांचा मुलगा) आणि विराट कोहली यांची भेट झाली. त्यावेळी दोघांमध्ये रेस्टॉरंट आणि बंगला या संदर्भात बोलणी झाली. आता हा बंगला विराट याला पाच वर्षांसाठी भाड्यानं दिला जाणार आहे.

हे वाचा-दीपिका-कार्तिकीवर आली एकच रेनकोट वापरण्याची वेळ; लेकीसाठी कार्तिकनं घेतला मोठा निर्णय

किशोर कुमार यांचं कुटुंब

दरम्यान, गायक आणि अभिनेता किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी चार लग्न केली होती. १९५० मध्ये त्यांनी रूमा गुहा यांच्याबरोबर पहिलं लग्न केलं. परंतु आठ वर्षानंतर ते विभक्त झाले. त्यानंतर १९६० मध्ये मधुबाला आणि किशोर कुमार यांनी लग्न करण्याचा लग्न केलं. परंतु लग्नानंतर नऊ वर्षानंतर मधुबाला याचं निधन झालं. त्यानंतर किशोर कुमार यांनी योगिता बाली यांच्याशी आणि त्यानंतर लीना चंदावरकर यांच्याशी लग्न केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here