नेमकं घडंल तरी काय होतं…या सामन्यातील भारताची फलंदाजी संपल्याववर ही गोष्ट पाहायला मिळाली होती. भारताने २० षटके पूर्ण खेळली. अखेरच्या चेंडूवर दुहेरी धाव घेतल्यावर कोहली मैदान सोडून निघेल, असे वाटत होते. पण तो सूर्याची वाट पाहत थांबला होता. सूर्या मैदानातून बाहेर निघत असताना कोहली त्याची वाट पाहत होता. सूर्या जसा त्याच्या जवळ गेला तेव्हा कोहली त्याच्यापुढे झुकला आणि त्याला मानाचा मुजरा केला. या गोष्टीचा व्हिडिओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे.
सूर्यकुमार यादव नेमकं काय म्हणाला, पाहा…या गोष्टीबाबत सूर्याने समाचोलकांनी विचारल्यावर तो म्हणाला की, ” कोहली हा माझ्यापेक्षा वरीष्ठ खेळाडू आहे. त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. कोहलीचा असा अनुभव मला यापूर्वी कधीच आला नव्हता. मला आश्चर्य वाटले की तो माझ्या पुढे का जात नाही आणि जेव्हा मला ते कळले तेव्हा मी त्याला माझ्याबरोबर येण्यास सांगितले. मला त्याच्यासोबत फलंदाजी करताना खूप आनंद झाला. पुढच्या चेंडूंमध्ये कोणता दृष्टिकोन स्वीकारायचा यावर आम्ही बोलत होतो. तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि मी जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. त्यामुळे अशा वेळी सामन्यात असा अनुभवी खेळाडू असणे खूप महत्त्वाचे आहे.”
सूर्याने कोहलीबरोबर ९८ धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि त्यामध्ये सूर्याचा वाटा हा ६८ धावांचा होता, यावरूनच चित्र स्पष्ट होऊ शकते. कोहलीनंतर येऊनही सूर्याने कोहलीपेक्षा जास्त धावा केला. कोहलीने ४४ चेंडूंत नाबाद ५९ धावा केल्या तर सूर्याने फक्त २६ चेंडूंत नाबाद ६८ धावांची तुफानी खेळी साकारली. कोहलीचे अर्धशतकही सूर्यामुळेच झाकोळले गेले. सूर्याने या सामन्यात सध्याच्या घडीला कोण सरस आहे हे दाखवून दिले. त्यामुळे एकेकाळी अहंकार दाखवणारा कोहली सूर्यासाठी खास थांबल्याचे पाहायला मिळाले.
आपल्या फलंदाजीबाबत सूर्या म्हणाला की, ” सूर्यकुमार म्हणाला, “परिस्थिती अशी होती की मी क्रीजवर येताच आक्रमक फलंदाजी करणे माझ्यासाठी आवश्यक होते. सुरुवातीला विकेट थोडी संथ खेळत होती आणि मी विराट कोहलीशी बोललो. त्याने मला माझा नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला. माझी रणनीतीही स्पष्ट होती आणि म्हणूनच मी फलंदाजीचा आनंद लुटला.”