Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 1, 2022, 7:27 PM

Ratnagiri News : रत्नागिरीतील खेडमधील आयनी गावात एका ३० वर्षीय तरुणाचा विजेचा झटका लागल्याने मृत्यू झाला आहे. गणपतीचे डेकोरेशन करताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

Ratnagiri News
गणरायाच्या आगमनापूर्वीच कुटुंबावर शोककळा; विजेचा धक्का लागल्याने सारं काही संपलं

हायलाइट्स:

  • गणपतीचे डेकोरेशन करताना तरुणाचा मृत्यू
  • ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर
  • रत्नागिरी खेड आयनी येथील धक्कादायक प्रकार
रत्नागिरी : महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. हा कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे. त्यामुळे यादिवशी कोकणात सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. मात्र, गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील आयनी गावात मोठी दुर्घटना घडली. गणरायाच्या आगमनाच्या पूर्वतयारीला डेकोरेशन करत असताना आयनी शेरी घागुर्डेवाडी येथील ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश रघुनाथ जाधव असे त्या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ३० ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास रुपेश हा आई , दोन मुले, पत्नी यांच्या मदतीने राहत्या घरी गणपतीचे डेकोरेशन करत होता. अचानक विजेचा शॉक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यांच्या आतल्या घरात रुपेश पडलेला दिसला यावेळी त्याच्या बोटाला जोरदार शॉक लागल्याचे लक्षात येताच तात्काळ धावपळ करण्यात आली.

व्हिसा मिळण्यासाठी भक्तांची रांग लागते; वाचा लक्ष्मी visa गणपती मंदिराची अनोखी स्टोरी
हा प्रकार त्यांनी जवळ असलेल्या नातेवाईकांना कळवला यावेळी त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्याला अधिक उपचारासाठी लोटे येथील परशुराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वी त्याचा मृत्यी झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी खेड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बच्चू कडूंना गोड खार द्यायचं की तीखट, हे मुख्यमंत्री ठरवतील; शिंदे गटातील मंत्र्यांच्या वक्तव्याने…

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here