म. टा. प्रतिनिधी, ठाणे : जमिनीचे झोन प्रमाणपत्र देण्यासाठी २४ हजारांची लाच घेताना गुरुवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) उप नियोजक शिवराज पवार यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. एसीबीने एमएमआरडीएच्या ठाणे कार्यालयातच सापळा लावून ही कारवाई केली.
तक्रारदार यांच्या परिचयाच्या व्यक्तीच्या मालकीची जमीन विकसित करण्यासाठी झोन प्रमाणपत्र देण्यासाठी १५ हजारांची तसेच तक्रारदाराच्याच मित्राच्या मालकीच्या जमिनीच्या झोन प्रमाणपत्रासाठी देखील १२ हजारांची लाच मागण्यात आली होती. या लाचेबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर ३० ऑगस्टला एसीबीने याबाबत पडताळणी केली. या पडताळणीमध्ये उप नियोजक शिवराज पवार यांनी झोन प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येकी १२ हजारांप्रमाणे एकूण २४ हजारांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर एसीबीच्या ठाणे युनिटने गुरुवारी एमएमआरडीएच्या ठाणे कार्यालयातच सापळा लावून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना शिवराज पवार यांना रंगेहात पकडले.
शिवसेनेवरील देखाव्यावर कारवाई, निषेध म्हणून गणेश मूर्तीची स्थापना न