मुंबई : महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत अशात भांडूपमध्येही पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत दोन ज्येष्ठ नागरिकांना अटक केली आहे. दोन वर्षांत वेगवेगळ्या ठिकाणी दोन ज्येष्ठ नागरिकांसह तिघांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. त्यानंतप पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

भांडुप पोलिसांनी आयपीसी कलम ३७६ आणि ३७६ (ए)(बी), आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८ आणि १२ अन्वये दोन वृद्ध नागरिक आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

उद्धव ठाकरेंना आणखी दिलासा, संभाजी ब्रिगेडनंतर मराठा सेवा संघाचाही पाठिंबा
मिळालेल्या माहितीनुसार, देवामृत समाजसेवा संस्थेच्या एनजीओच्या सदस्या प्रिया चव्हाण यांनी २० जून रोजी मुलीला पाहिलं आणि त्यानंतर तिला बालगृहात ठेवलं. तिने चव्हाण यांना सांगितले की ६२ वर्षे आणि ६५ वर्षे वयोगटातील दोन व्यक्ती तिला भेटले आणि त्यांनीच तिला मोठं केल्याचं दावा करत होते.

आरोपींचे वर्तन पाहून परिविक्षा अधिकारी छाया मुथा यांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता या दोघांनी आपला लैंगिक छळ केल्याचे तिने उघड केले. सुरुवातीला, मुलीने कर्मचाऱ्यांना सांगितले की, तिचे पालक वेगळे झाले आहेत आणि तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. ती तिच्या आईच्या मावशीकडे राहत होती आणि आजीला घर नसल्याने तिने तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीची मदत घेतली होती.

फडणवीसांचा ठाकरेंना पुन्हा एकदा शह; महाविकास आघाडीने बंद केलेली ती योजना पुन्हा सुरू
“आजीच्या मालकाने त्यांना राहण्यासाठी झोपडीसारखी जागा दिली होती. तिच्या आजीला ओळखणारा एक आरोपी अनेकदा तिच्या घरी यायचा आणि जेव्हा तिची आजी आणि मालक बाहेर असतात तेव्हा तो मुलीवर बलात्कार करायचा,” अशी माहिती मुथ्था यांनी दिली.

सात महिने पगार नाही, मग नोकरीवरून काढलं; कारखान्याबाहेर एकाचवेळी ७ कामगार विष प्यायले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here