खराब हवामानामुळे आवश्यक दृश्यमानता नसल्याने मुंबईहून औरंगाबादला निघालेले विमान औरंगाबादमध्ये उतरलेच नाही. या विमानाने आभाळात सहा घिरट्या मारल्या आणि ते पुन्हा मुंबईला परतले. दोन तासांनंतर हे विमान पुन्हा औरंगाबादेत दाखल झाले.

 

indigo
औरंगाबाद: खराब हवामानामुळे आवश्यक दृश्यमानता नसल्याने मुंबईहून औरंगाबादला निघालेले विमान औरंगाबादमध्ये उतरलेच नाही. या विमानाने आभाळात सहा घिरट्या मारल्या आणि ते पुन्हा मुंबईला परतले. दोन तासांनंतर हे विमान पुन्हा औरंगाबादेत दाखल झाले. खराब हवामानामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.

गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. याचा फटका शहरातील सखल भगात राहणाऱ्या आणि नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांना बसल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र संध्याकाळी पावसामुळे खराब हवामानामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाल्याचा फटका हवाई प्रवासालादेखील बसल्याचे पाहायला मिळाले.
पत्नी गेली माहेरी, बहिणीला डबा पाठवायला सांगितलं; त्यानंतर बांगडीवाल्यानं टोकाचं पाऊल उचललं
इंडिगो एअरलाईन्सचे मुंबई-औरंगाबाद मार्गावर उड्डाण करणारे विमान संध्याकाळी साधारण ५.४० ते ६ च्या दरम्यान औरंगाबादेत दाखल होते. नेहमीप्रमाणे हे विमान गुरुवारी संध्याकाळी औरंगाबादच्या हवाई क्षेत्रात दाखल झाले. मात्र पाऊस सुरु असल्याने व कमी दृश्यमानता असल्याने या विमानाला हवेतच घिरट्या घालाव्या लागल्या. हवेत सहा घिरट्या घेऊन हे विमान पुन्हा मुंबईला माघारी परतले.
सात महिने पगार नाही, मग नोकरीवरून काढलं; कारखान्याबाहेर एकाचवेळी ७ कामगार विष प्यायले
विमान उतरण्यासाठी किमान १२०० मीटरची दृश्यमानता आवश्यक असते. परंतु ही दृश्यमानता ३०० मीटरवर आली होती. त्यामुळे विमान उतरणे अशक्य होते. अशा परिस्थितीत विमानाने शहरावर ६ घिरट्या मारल्या. मात्र तरीही लँडिगसाठी लँडिंगसाठी दृश्यमानता मिळाली नाही. त्यामुळे हे विमान पुन्हा मुंबईला गेले. त्यानंतर हे विमान रात्री ८ च्या सुमारास विमान मुंबईहून औरंगाबादला दाखल झाले. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हा प्रकार झाल्याचे विमानतळाचे सहायक सरव्यवस्थापक विनायक कटके यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here