हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील सवना येथे रात्री आठ वाजताच्या सुमारास घरातील कुटुंबीयांना जेवण बनवत असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे अख्या गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातल्या सवना येथील अरुणा गजानन आरसोड वय वर्ष ४८ या रात्री आठ वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरामध्ये जेवण बनवत असताना अचानक घराचे जुने माळवत असलेले छत कोसळल्यामुळे अरुणा यांच्या डोक्यामध्ये माळवदाची लाकडी नाठ लागली. इतकंच नाहीतर मातीच्या ढिगार्‍याखाली दबल्या गेल्यामुळे जखमी होऊन गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Mumbai Crime: दोन ज्येष्ठ नागरिकांनी केले ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, तपासात धक्कादायक माहिती समोर
अरुणा यांचे पती गजानन हे शेतातून आल्यानंतर त्यांना घरातील धक्कादायक प्रकार दिसून आला. संबंधित माहिती त्यांनी गावकऱ्यांना देताच अख्खं गाव मदतीसाठी धावलं. मातीच्या ढिगार्‍याखाली दबलेल्या अरुणा यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

संबंधित माहिती पोलीस प्रशासन व महसूल विभागाला कळवण्यात आली असून अरुणा यांचा मृतदेह गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अरुणा यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी, पती असा परिवार आहे. घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळलं आहे.

ऐन गणेशोत्सवात हवामान खात्याकडून पावसाचा इशारा; कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here