nashik paus news today, नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; नागरिकांचे रेस्क्यू, गाड्या वाहिल्या, पावसाचं रौद्ररूप दाखवणारा VIDEO – cloudburst like rain in nashik rescue of citizens from jcb
नाशिक : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असताना नाशिकमध्ये मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सिन्नरला ढगफुटी सदस्य पाऊस झाल्याने संपूर्ण गावांची आणि तालुक्यांची दाणादाण उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
पूल वाहून गेल्याने मोठा ट्रक पाण्यात अडकला असल्याची माहिती तर यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही भागांमध्ये पाऊस आहे तर काही भागांमध्ये पावसाची उघडीप आहे. अशात नाशकात मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईनाका, शालिमार, सीबीएस, जुने नाशिक, रामकुंड, राणे नगर, पंचवटी भागात अवघ्या १५ मिनिटं झालेल्या पावसात रस्ते पाण्याखाली गेले होते.
पुराच्या पाण्यात तरुण वाहून गेला तर ६ चारचाकी ते १८ मोटारसायकल वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक कुटुंबांना JCB वर बसवत रेस्क्यू केलं जात आहे.