mothers heart touching letter to lalbaugcha raja: वाशीमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेच्या मुलीनं २ वर्षांपूर्वी आत्महत्या केली. २०१९ मध्ये आई मुलीसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आली होती. दोघी नवसाच्या रांगेत आठ तास उभ्या होत्या. यावेळी मुलीचा तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाशी वाद झाला.

‘२०१९ मध्ये लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत मी आणि माझी मुलगी ८ तास उभे राहिलो होतो. रांग जराही पुढे सरकत नसल्यानं माझ्या मुलीचे पाय खूप दुखत होते. त्यामुळे मुलगी त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या सिक्युरिटी गार्डसोबत बोलायला गेली. तिथे त्यानं तिच्या मनाला लागेल असं काहीतरी चुकीची भाषा वापरून विचित्र उत्तर दिलं. ते ऐकून माझ्या मुलीनं मला घेतलं आणि रांगेतून बाहेर निघून दर्शनासाठी न थांबता घरी निघालो. माझ्या मुलीचं मानसिक संतुलन त्या दिवशी बिघडलं आणि तिनं संध्याकाळी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं,’ असं आईनं बाप्पाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मुलीनं रांगेत उभं असताना काढलेलं चित्रसुद्धा या पत्रात आहे. नवसाच्या रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना खुर्च्या देण्यात याव्यात अशा स्वरुपाचं चित्र पत्रात रेखाटण्यात आलं आहे. नवसाच्या रांगेतील भाविकांना बसण्यास खुर्च्या देऊन तिच्या दिवंगत आत्म्यास शांती मिळावी, अशी इच्छा आईनं पत्रात व्यक्त केली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.