यूके : ‘देने वाला जब भी देता छप्पर फाड़ के’ ही म्हण सगळ्यांनाच माहिती आहे. अगदी असाच प्रकार एका जोडप्यासोबत समोर आला आहे. एक जोडपे त्यांच्या जुन्या घराचं रिनोवेशन करत असताना असा काही प्रकार घडला की ते एकाच दिवसात कोट्याधीश झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वयंपाकघरात जमिनीखालील खजिना आढळला आहे. जमिनीच्या उत्खननात त्यांना १८ व्या शतकातील २६४ सोन्याची नाणी सापडली, ज्यांची किंमत अंदाजे २ कोटी ३० लाख रुपये आहे. विशेष म्हणजे हे जोडपे गेल्या १० वर्षांपासून या घरात राहत होते. मात्र, त्यांना या खजिन्याची कोणतीही माहिती नव्हती. पण जुलै २०१९ मध्ये घराचं काम सुरू असताना त्यांना स्वयंपाकघरातील मजल्याखाली सोन्याची नाणी सापडली.

नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; नागरिकांचे रेस्क्यू, गाड्या वाहिल्या, पावसाचं रौद्ररूप दाखवणारा VIDEO
या नाण्यांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांनी ताबडतोब लंडनस्थित एका लिलाव कंपनीशी संपर्क साधला. त्यांनी या जोडप्याला सांगितले की ही नाणी खूप जुनी आणि पुरातन आहेत. काही नाणी ४०० वर्षांपेक्षा जुनी होती. अलीकडेच सर्व २६४ नाणी लिलावासाठी ठेवण्यात आली होती, जिथे त्याची किंमत अंदाजे २ कोटी ३० लाख रुपये होती. सोन्याच्या नाण्यांची एवढी मोठी किंमत जाणून या जोडप्याला आश्चर्य वाटले, कारण एका झटक्यात ते करोडपती झाले होते.

लिलावकर्ता ग्रेगरी एडमंड म्हणाले की, ही एक अनेक नाणी अत्यंत दुर्मिळ आहेत. ही नाणी पुरातत्व विभागासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. द मिररच्या वृत्तानुसार, यूकेच्या यॉर्कशायरमधील एलरबी गावचे आहे. ते स्वयंपाकघरात मजल्याचे काम करत होते. तेव्हा त्यांना जमिनीतून एक पेटी सापडली. या पेटीत सोन्याची नाणी होती. नंतर आणखी अनेक पेट्या सापडल्या आणि त्यातूनही सोन्याची एकूण २६४ नाणी सापडली.

Mumbai Crime: दोन ज्येष्ठ नागरिकांनी केले ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, तपासात धक्कादायक माहिती समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here