small child died after getting shock from ice cream fridge: आपल्या लहान मुलीचा हट्ट पुरवणे वडिलांना महागात पडले आहे. आईस्क्रीम खाण्यासाठी गेलेल्या चिमुकलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. चिमुरडीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सिडकोतील त्रिमूर्ती चौक उंटवाडी रोड परिसरात ही घटना घडली.

 

fridge shock
नाशिक: आपल्या लहान मुलीचा हट्ट पुरवणे वडिलांना महागात पडले आहे. आईस्क्रीम खाण्यासाठी गेलेल्या चिमुकलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. चिमुरडीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सिडकोतील त्रिमूर्ती चौक उंटवाडी रोड परिसरात ही घटना घडली.

विशाल कुलकर्णी त्यांची मुलगी ग्रीष्मासह (वय ४) घराजवळ असलेल्या मेडिकल दुकानात सायंकाळी ९ च्या सुमारास आईस्क्रीम खाण्यासाठी गेले होते. तिथे असलेल्या ग्रीष्माला फ्रिजच्या वायरचा शॉक लागून ती खाली बेशुद्ध पडली. यामुळे घाबरलेल्या विशाल यांनी तिला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. यामुळे कुलकर्णी कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here