ganesh festival 2022: अहमदनगरमध्ये एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने शहरामधील तपोवन नगर येथे युवराज गुंड यांच्या बालघर प्रकल्पामध्ये विधवा महिलांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात सर्वप्रथम हा वेगळा उपक्रम राबवला गेला.

 

ganesh pooja
अहमदनगर: वैधव्य प्राप्त झालेल्या महिलांना हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार कोणत्याही शुभ कार्यप्रसंगी सहभागी करून घेतले जात नाही. परंतु या रूढीला फाटा देत अहमदनगरमध्ये एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने शहरामधील तपोवन नगर येथे युवराज गुंड यांच्या बालघर प्रकल्पामध्ये विधवा महिलांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात सर्वप्रथम हा वेगळा उपक्रम राबवला गेला. विधवा महिलांचा साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बालघर प्रकल्पामधील बालकलाकारांनी आपल्या कला सादर केल्या.

यावेळी महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. असा उपक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक मंडळांने राबवला पाहिजे. यामुळे विधवा महिलेला तिचं उरलेले आयुष्य जगण्यासाठी हिंमत मिळेल, अशा भावना महिलांनी बोलून दाखवल्या. समाजाने रूढी परंपरांना फाटा देत विधवा महिलांना समाजात एक मानाचे स्थान द्यावे अशी इच्छा महिलांनी बोलून दाखवली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here