मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री साडे आठ वाजता प्रदीप वाईन शॉप या दुकानावर साई इंगळे नामक युवक आला. त्याने दुकानावर बियरची मागणी केली. साईने मागितलेली बियर तिथे उपलब्ध नसल्याचे दुकानातील कर्मचाऱ्याने सांगितले. तेव्हा साई इंगळे हा माझ्या पसंदीची बियर नाही का म्हणत दुकानातील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. पण दुकानातील कर्मचाऱ्यांनी असे वाद नेहमी होत असतात म्हणून त्या युवकाची दखल घेतली नाही. दरम्यान, पुन्हा तोच साई इंगळे नावाचा युवक इतर ४ ते ५ जणांना घेऊन वाईन शॉप वर आला. या युवकांनी वाईन शॉपचे लोखंडी गेट काढून वाईन शॉपमध्ये प्रवेश केला.
वाईन शॉप मधल्या सर्व कर्मचाऱ्यांना या युवकांनी मारहाण केली. वाईन शॉपचे व्यवस्थापक जीवनराव वाकोरे यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून या युवकांनी तिथून पळ काढला. या हल्ल्यात वाकोरे यांचा जागीच मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारेकऱ्यांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाणे सिडको येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ६ आरोपी असून ३ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दिली. ३ आरोपीचा शोध पोलीस घेत असल्याचे घोरबांड यांनी सांगितले.