५५ वर्षीय नरसिंहन, हे पूर्वी यूके (इंग्लंड) स्थित रेकिट बेंकिसर या बहुराष्ट्रीय ग्राहक आरोग्य, स्वच्छता आणि पोषण कंपनीचे सीईओ होते. लंडनहून सिएटल येथे स्थलांतरित होऊन ते १ ऑक्टोबर २०२२ रोजी स्टारबक्समध्ये सामील होतील. त्यांनतर नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्यापूर्वी आणि १ एप्रिल २०२३ रोजी बोर्डात सामील होण्यापूर्वी अंतरिम सीईओ हॉवर्ड शुल्ट्झ यांच्यासोबत जवळून काम करतील, असे कंपनीने म्हटले आहे. पण लक्ष्मण नरसिम्ह यांच्याशिवाय परदेशी कंपन्यांची कमान सांभाळणारे अन्य भारतीय वंशाचे व्यावसायिक कोण आहेत, हे आपण जाणून घेऊया.
लीना नायर
युनिलिव्हरमधील पहिल्या महिला आणि सर्वात तरुण-मुख्य मानव संसाधन अधिकारी, नायर डिसेंबर २०२१ मध्ये फ्रेंच लक्झरी फॅशन हाऊस चॅनेलच्या ग्लोबल सीईओ म्हणून सामील झाल्या. झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या माजी विद्यार्थी, नायर यांनी जानेवारी २०२२ मध्ये चॅनेलमध्ये तिची नवीन कामकाज हाती घेतले.
पराग अग्रवाल
अग्रवाल यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये ट्विटरचे मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO) पदावरून कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यांनी सह-संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांची जागा घेतली, ज्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्यावर अग्रवाल यांची आपला उत्तराधिकारी म्हणून निवड केली.
संदीप कटारिया
२०२१ मध्ये त्यांची बाटाचे ग्लोबल CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. कंपनीच्या १२६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका भारतीयाला सर्वोच्च पदावर नियुक्त करण्यात आले. यापूर्वी ते बाटा इंडियाचे सीईओ म्हणून कार्यरत होते. कटारिया हे IIT-दिल्ली आणि XLRI-जमशेदपूरचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच ते XLRI मधील १९९३ PGDBM बॅचचे सुवर्णपदक विजेता होते.
सुंदर पिचाई
गेल्या दशकात भारताने पाहिलेल्या सर्वात मोठ्या यशोगाथांपैकी एक म्हणजे पिचाई. ते Alphabet Inc. आणि त्याची उपकंपनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पिचाई २०१५ मध्ये गुगलचे सीईओ बनले.
सत्या नाडेला
हैदराबादमध्ये जन्मलेल्या ५४ वर्षीय नडेला यांची फेब्रुवारी २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर जून २०२१ मध्ये त्यांना कंपनीचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आले, ही अतिरिक्त भूमिका आहे ज्यामध्ये ते बोर्डासाठी अजेंडा सेट करण्याच्या कामाचे नेतृत्व करत आहेत. पिचाई यांच्यासह नडेला यांना या वर्षी जानेवारीत ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचा तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला.
शंतनू नारायण
Adobe सिस्टम्सचे CEO नारायण १९९८ मध्ये कंपनीत रुजू झाले. त्यानंतर नोव्हेंबर २००७ मध्ये उच्च पदावर त्यांची नियुक्ती झाली.
अरविंद कृष्णा
एप्रिल २०२० पासून ते IBM चे CEO आहेत. २०२१ मध्ये कृष्णा यांना IBM संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आले असून त्यांनी IBM कार्यकारी अध्यक्ष व्हर्जिनिया एम रोमेट्टी यांची जागा घेतली आणि जानेवारी २०२१ मध्ये कंपनीत ३० वर्षांहून अधिक काळानंतर उच्च पदावर सुरुवात केली.
जॉर्ज कुरियन
कुरियन हे २०१५ पासून स्टोरेज आणि डेटा मॅनेजमेंट कंपनी NetApp चे CEO आहेत. त्यांनी उत्पादन ऑपरेशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.