Maharashtra Politics | रामदास कदम यांची पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड. माझं राजकारणातील वय ५२ वर्षे आहे. आपलं वय काय, आपण काय बोलतोय, आपण ठाकरे कुटुंबातील व्यक्ती आहोत, याच भान आदित्य ठाकरे यांनी बाळगलं पाहिजे. आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या आमदारांना ५० खोके मिळाल्याचे सांगतात. पण त्यांनी आधी मातोश्रीवरील १०० खोक्यांबाबत खुलासा करावा.

हायलाइट्स:
- उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला
- त्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली
- उद्धव ठाकरे हेच गद्दार आहेत
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. त्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच गद्दार आहेत, एकनाथ शिंदे आणि ५० आमदार नव्हेत, असेही रामदास कदम यांनी म्हटले.
यावेळी रामदास कदम यांना आदित्य ठाकरे यांच्यावरही टीकेची तोफ डागली. आदित्य ठाकरे आता ३१ वर्षांचे आहेत. माझं राजकारणातील वय ५२ वर्षे आहे. आपलं वय काय, आपण काय बोलतोय, आपण ठाकरे कुटुंबातील व्यक्ती आहोत, याच भान आदित्य ठाकरे यांनी बाळगलं पाहिजे. आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या आमदारांना ५० खोके मिळाल्याचे सांगतात. पण मातोश्रीवर गेलेल्या १०० खोक्यांचे काय? मातोश्रीवर मिठाईचे कितीही खोके गेले तरी मातोश्रीला डायबेटिस होत नाही. आदित्य ठाकरे यांनी त्यावर आधी बोलावे, असशी टीका रामदास कदम यांनी केली.
‘उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते मुख्यमंत्री शिंदेंनी करून दाखवलं’
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे यावर्षी गणेशोत्सवात कोकणवासीयांचा प्रवास वेळेत झाला. या प्रवासाला आधी १५ ते २० तास लागत होते. मात्र आता साडेचार पाच तासात खेडला गणेशभक्त आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता, खड्डे भरले गेले, जड वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद ठेवल्या. त्यामुळे प्रवास यावर्षी सुखाचा झाला. आपले सरकार आता आलं आहे, ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकणात येण्यासाठी ३५० मोफत एसटी बसेस दिल्या. हे पहिल्यांदाच घडलं आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांना जे जमलं नाही असे अनेक महत्वपूर्ण निर्णय या सरकारने घेतले आहेत,’असे रामदास कदम यांनी म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.