Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 2, 2022, 5:42 PM
Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील मंठा शहरातील वार्ड क्रमांक सहा मधील डीपी वेळेवर दुरुस्त न झाल्याने भाजपच्या नगरसेविकेचा पती असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्याचा राग अनावर झाला. त्यांनी थेट कार्यलयात जाऊन तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हायलाइट्स:
- नगरपंचायत वार्ड क्रमांक सहा मधील डीपी वेळेवर दुरुस्त नाही
- नगरसेविकेचा पती असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्याचा राग अनावर
- महावितरण कार्यालयात जाऊन तोडफोड करत केली शिवीगाळ
कार्यालयात पोहचताच तिथे फक्त रिकामे टेबल खुर्च्या दिसल्याने त्यांचा राग अनावर झाला. या पती महाशयांनी महावितरण कार्यालयाची तोडफोड केली. वारंवार तक्रार करूनही डीपी दुरुस्त न झाल्याने वॉर्डातील नागरिक त्यांना विचारपूस करत आहेत आणि कर्मचाऱ्यांना फोन करतात तर त्यांचा फोन देखील उचलत नसल्याने हा प्रकार घडला आहे.
शेष नारायण दवणे असं या महाशयांच नाव असून रागाच्या भरात त्यांनी कार्यालयातील खुर्ची, टेबल यांना आपटून तोडफोड केली आहे. एवढ्यावरच न थांबता तोंडाने शिव्यांची लाखोली वाहत त्यांनी वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांवर चांगलेच तोंड सुख घेतले आहे. त्यांच्या या पराक्रमाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.