राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना आणि शिवसेनेच्या नेते पदी कार्यरत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान देत भाजपसोबत सत्ता स्थापन करुन मुख्यमंत्रिपद पटकावलं आहे.यासाठी त्यांनी पक्षातील बहुतांश आमदारांचा पाठिंबा घेत त्यांनी थेट गुवाहटी गाठली होती.यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्यास भाग पाडत भाजपा सोबत जवळीक करत आणि स्वतः मुख्यमंत्री झाले आहेत.मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना ठाकरे गटाकडून लक्ष केलं जातं होत.मात्र शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रवक्ते, नेते या पदाच्या नियुक्त्या केलेल्या आपण पाहिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता राज्यभर दौरे करत आहेत, तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे राज्यभरात दौरे करत आहेत.त्यामुळे खासदार शिंदे यांच्या खांद्यावर शिंदे गटाने युवा सेना अध्यक्ष पदाची धुरा द्यावी असे शिंदे समर्थकांचे खाजगीत म्हणणे आहे.त्यामुळेच कार्यकर्ते फोटो आणि पोस्टर व्हायरल करत आहेत.

श्रीकांत शिंदे समर्थकांनी व्हायरल केलेलं पोस्टर
उद्धव ठाकरे हे मराठाद्वेष्टे, त्यांना मराठा माणूस मोठा झालेला बघवत नाही: रामदास कदम
सध्या राज्यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दौरे करत आहेत आणि त्याच दौऱ्या दरम्यान आपल्या भाषणात शिंदे गटावर ते टीकास्त्र करत आहेत.त्यामुळे आता आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी शिंदे सरकार युवा सेनेवर देखील दावा करण्यासाठी हे चालले आहे का सवाल आता उपस्थित केला जातो आहे.
Dasra Melava: शिंदे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अर्ज, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
शिवसेना प्रवक्ते, नेते यांच्या नियुक्त्या केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर युवा सेना अध्यक्ष पदाची धुरा देणार का ? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.