यावेळी भारतीय संघाच्या खेळाडूंनी वॉटर स्पोर्ट्स आणि बीच स्पोर्ट्सचा आनंद लुटला. काही जण सर्फिंग करण्यासाठी पाण्यात उतरले होते. त्यानंतर काही खेळाडू बीच व्हॉलिबॉल खेळत होते. रोहित शर्माही कायकिंग करताना दिसला.तर विराट कोहलीचा शर्टलेस लूक लक्षवेधी ठरला.
आशिया चषकाच्या अ गटात दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यामुळे ४ सप्टेंबरला भारतीय संघ सुपर फोर फेरीत आपला पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताचा सामना पु्न्हा पाकिस्तानसोबत होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात आज साखळी फेरीतला शेवटचा सामना होणार आहे. या सामन्यातला विजेता संघ रविवारी भारतासोबत खेळेल. हाँगकाँगची आतापर्यंतची कामगिरी पाहता पाकिस्तानचं पारडं या सामन्यात जड वाटतयं. त्यामुळे ४ सप्टेंबरला पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघात महामुकाबला होईल हे जवळपास निश्चित आहे.