Authored by किशोर पाटील | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 2, 2022, 8:26 PM

Jalgaon Crime News : होमवर्क केला नाही म्हणून एका खासगी क्लासमधील शिक्षिकेने अर्धनग्न करुन अमानुषपणे मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षिकेविरुद्ध अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

Jalgaon Crime News
होमवर्क केला नाही, शिक्षिकेची ९ वर्षीय मुलाला अमानुष मारहाण; जळगावातील धक्कादायक प्रकार

हायलाइट्स:

  • होमवर्क केला नाही म्हणून क्लासमधील शिक्षिकेची मुलाला अमानुष मारहाण
  • ९ वर्षाच्या मुलाला अर्धनग्न करत केली मारहाण
  • जळगाव शहरातील कोठडी क्लास मधील धक्कादायक प्रकार
जळगाव: होमवर्क केला नाही म्हणून एका खासगी क्लासच्या शिक्षिकेने एखा ९ वर्षाच्या मुलाला अर्धनग्न करत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी जळगाव शहरात घडली. पल्लवी जितेंद्र इंदानी (रा. मगर पार्क, वाघनगर, जळगाव असे विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली असून त्यावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शनीपेठ परिसरातील गुरुनानक नगर भागात राहणारे योगेश गणेश ढंढोरे यांचा ९ वर्षाचा मुलगा खुशाल हा बळीराम पेठेतील कोठारी नावाने असलेल्या खासगी क्लास येथे शिकण्यासाठी जातो. शहा दाम्पत्य संचलीत या क्लासमधे पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. या क्लासमधील पल्लवी इंदानी या शिक्षिकेने होमवर्क केला नाही या कारणावरून खुशाल या ९ वर्षाच्या बालकाचे अंगातून टीशर्ट काढले तसेच त्याला चापटांनी मारहाण केली असे खुशाल याचे वडील योगेश ढंढोरे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

कल्याणमधील मंडळाला गणपती पावला! पोलिसांनी देखावा जप्त केला, पण न्यायालयाची सशर्त परवानगी
नेहमी मारहाण होत असल्याचे खुशाल याने पालक योगेश ढंढोर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीत कितपत तथ्य आहे हे बघण्यासाठी त्यांनी अचानक या क्लासमधे प्रवेश केला असता खरा प्रकार उघड झाला. पालक समोर येताच या शिक्षिकेने विद्यार्थी बालकास त्याचे कपडे परत देत सावरासावर करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. असे योगेश ढंढोरे यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी शिक्षिका पल्लवी इंदानी विरोधात दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेने जळगाव शहरात खळबळ उडाली असून शिक्षिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदरच्या विमानतळाबाबत केंद्र सरकारने घेतला हा निर्णय; फडणवीस म्हणाले…

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here