Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 2, 2022, 10:31 PM
Maharashtra Politics | शरद कोळी यांचा शहाजीबापूंवर निशाणा. शरद कोळी यांनी शहाजी पाटील यांचे अक्षरश: वाभाडे काढले. शहाजी पाटील यांनी वायफळ बडबड बंद करा, अन्यथा तुमच्या घरावर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा यावेळी शरद कोळी यांनी दिला. ते संत्रा पिऊन बोलताना कीहातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, नेमकं तेच कळत नाही.
हायलाइट्स:
- उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सांगोल्यात येऊन लोकांची कामं करावी
- त्यासाठी मी दोघांना बंगले भाड्याने घेऊन देतो
यावेळी शरद कोळी यांनी शहाजी पाटील यांचे अक्षरश: वाभाडे काढले. आमदार होण्यासाठी शहाजी बापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते, याचा आता त्यांना विसर पडला आहे. शहाजी पाटील यांनी वायफळ बडबड बंद करा, अन्यथा तुमच्या घरावर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा यावेळी शरद कोळी यांनी दिला. ते संत्रा पिऊन बोलताना कीहातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, नेमकं तेच कळत नाही, अशी बोचरी टीकाही शरद कोळी यांनी केली. यावर आता शहाजीबापू पाटील काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
माझ्याएवढी पडायची प्रॅक्टिस कोणालाच नाही: शहाजीबापू पाटील
शिंदे गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याच्या चंद्रकांत खैरे यांचा दावा शहाजी पाटील यांनी अलीकडेच खोडून काढला होता. शिवसेनेनं सांगोल्यात लक्ष घातलंय असं विचारलं असता शहाजी बापू पाटील यांनी मला पाडणार का?, असा प्रतिसवाल केला. पडायची प्रॅक्टिस महाराष्ट्रात माझ्याएवढी कुणाची आहे? मी सात आठवेळा धडाधडा पडलो होतो, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सांगोल्यात येऊन लोकांची कामं करावी. त्यासाठी मी दोघांना बंगले भाड्याने घेऊन देतो, अशी टिप्पणी शहाजीबापू पाटील यांनी केली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.