कोल्हापूर : कोल्हापुरातील आजरा तालुक्यात उत्तूर गारगोटी महामार्गावर हॉटेल आणि घरावर अनधिकृतरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापेमारी करत तब्बल पावणेनऊ लाखाचे मुद्देमाल ताब्यात घेतले असून या प्रकरणी आतापर्यंत ११ जणांवर आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तूर तालुका आजरा इथे उत्तूर गारगोटी मार्गावर मारूती लक्ष्मण गुरव राहणार महालक्ष्मी मंदिराजवळ यांच्या हॉटेल व घराच्या पहिल्या मजल्यावर रमी हा जुगार प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली. यानंतर आजरा पोलिसांकडून या जागी छापा टाकला.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, प्रसूती रजेविषयी केंद्राचा मोठा निर्णय
छाप्यामध्ये रोख रकमेसह आठ लाख ६६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी तब्बल अकरा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेले काही दिवस सदर ठिकाणी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे व त्यांच्या टिम यांनी सापळा रचून सदर अड्ड्यावर छापा टाकला.

येथे जुगार खेळणारे अकरा जण आढळून आले. यामध्ये अड्डाचालक मारुती हनुमंत हत्तरगी (रा. उत्तूर ता. आजरा) घरमालक मारूती लक्ष्मण गुरव (रा. महालक्ष्मी मंदिर जवळ, उत्तूर ता. आजरा) य‍ाच्यासह ११ जणावर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. संबंधितांकडून रोख रकमेसह दोन मोबाइल, चारचाकी गाडी, दोन मोटर सायकली इत्यादी साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई लोकल: उद्या मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक नाही, मात्र पश्चिम मार्गावरील वाहतूक खोळंबणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here