पालघर : पालघर जिल्ह्यातील कांद्रेभुरे येथील रहिवासी असलेला शैलेश दिनेश पाटील (वय २६) या तरुणाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर मुलाच्या मृत्यूचे दु:ख अनावर झाल्याने आई कल्पना पाटील यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ‘सेक्स्टॉर्शन’मधून हा प्रकार घडल्याचा आरोप शैलेश यांचे निकटवर्ती करत आहेत. तर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
यावेळी शोधाशोध केल्यानंतर गळफास घेतलेल्या अवस्थेत शैलेशचा मृतदेह कल्पना यांना आढळला. एकुलत्या एका मुलाचा असा मृत्यू झाल्याचे पाहिल्यानंतर त्यांना हे दुःख अनावर झाले आणि त्यांनीही जवळच्या विहिरीत उडी घेऊन प्राण दिला.