बबनराव पाचपुतेंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीचा मोठा डाव; श्रीगोंद्यात बड्या नेत्याचा पक्षप्रवेश – balasaheb nahata will join the ncp today in srigonda in the presence of ajit pawar
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत थोडक्यात परभाव पत्कारावा लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर आतापासूनच विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. भाजपमध्ये जाऊन आमदार झालेला एकेकाळचे पवार कुटुंबियांचे कट्टर समर्थक आमदार बबनराव पाचपुते यांना घेरण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून एकेकाळी पाचपुते यांचेच समर्थक असलले मात्र नंतर दुरावलेले राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज श्रीगोंद्यात हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे नहाटा यांच्याकडे आतापासूनच संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जाऊ लागलं आहे.
दरवेळी पक्ष बदलून विजय मिळविणारे पाचपुते यांनी गेल्यावेळीही भाजपकडून निवडणूक लढवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा थोडक्यात पराभव झाला होता. पक्ष सोडलेल्या नेत्यांपैकी एक असल्याने पाचपुते यांच्यावर पवार कुटुंबियांचा रोष आहेच. त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून तयारी सुरू झाली आहे. या मतदारसंघात समन्वयाची जबाबदारी पूर्वीच कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. अजित डोवाल तातडीने मुंबईत, राज्यपालांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, महत्त्वाचं कारण समोर
नहाटा यांचा आज प्रवेश होत असला तरी याची सुरुवातही पूर्वीच झाली आहे. राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाचे सभापतीपद राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. ते नहाटा यांना देण्यात आले, तेव्हाच याची कुणकुण लागली होती. नहाटा यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बबनराव पाचपुते यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून झाली. बराच काळ ते पाचपुते यांच्यासोबत राहिले. पाचपुते यांच्याशी मतभेद झाल्याने पाचपुते गटाला सोडचिठ्ठी देत नागवडे, जगताप गटाला साथ दिली. एवढेच नव्हे तर साखर कारखाना खरेदीच्या व्यवहारात त्यांनी थेट पवारांशीही पंगा घेतला होता. अर्थात त्याचे गंभीर परिणामही त्यांना भोगावे लागले. या काळात त्यांचे राजकारणा संपते की काय, अशी स्शिती निर्माण झाली होती. मात्र, ते पुन्हा सावरले. पुढे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करून रासपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. त्यानंतर बदलत्या राजकारणामुळे त्यांची पुन्हा पवारांशी जवळीक वाढली.
बाजार समितीच्या राजकारणातून बाळासाहेब नहाटा पुढे आले. त्यासाठी त्यांनी अजित पवार यांची मदत घेतली. पवार यांनीही पुढील समीकरणे लक्षात घेत त्यांना साथ दिली. नहाटा अधिकृतपणे पक्षात येण्यापूर्वीच त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील महासंघाचे सभापतीपदही देण्यात आले. त्यानंतर आता ते अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. हा पाचुपते यांच्यासह नागवडे गटालाही धक्का आहे.