Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 3, 2022, 3:08 PM

Parbhani Crime News : परभणीत पोलीस कर्मचाऱ्याचा दारु पिऊन एका ढाब्यावर धिंगाणा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील वसमत रोडवर हा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 

Parbhani Crime News
VIDEO: मी पोलीस आहे, जेवणाचे बिल देत नाही; मद्यधुंद पोलिसाचा परभणीत धिंगाणा

हायलाइट्स:

  • दारु पिऊन ढाब्यावर पोलीस कर्मचाऱ्याचा धिंगाणा
  • मी पोलीस कर्मचारी आहे, जेवणाचे बिल देणार नाही
  • परभणीतील संतापजनक प्रकार
परभणी : ‘मी पोलीस कर्मचारी आहे, तुला माहीत नाही का, जेवणाचे बिल देत नाही’ असे म्हणून एका पोलीस कर्मचाऱ्याने परभणी शहरातील वसमत रोडवर एका ढाब्यावर दारू पिऊन धिंगाणा घातला. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. ओमकार मागनाळे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

परभणी शहरातील वसमत रोडवरील रोहन केराब काळे यांच्या ढाब्यावर पोलीस कर्मचारी ओमकार मागनाळे इतर दोघा जणांसोबत गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर जेवणाचे बिल मागनाळे यांना दिल्यानंतर त्यांनी ढाबा चालकाला मी पोलीस कर्मचारी आहे. तुला माहित नाही का. तुला बघून घेईल, अशी धमकी ढाबा चालक काळे यांना दिली आणि दारू पिऊन धिंगाणा घालून बिल न देता निघून गेले.

आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?
दमदाटी करणाच्या या कर्मचाऱ्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. जेवणाचे बिल ही दिले नाही आणि धमकी देत असल्याने ढाबा चालकाने तातडीने नवा मोंढा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीसांनी रात्री पावणे दहाच्या सुमारास पोलीस कर्मचारी ओमकार मंगनाळे याच्या विरुध्द तक्रार दाखल केली त्यावरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

अंबानींचा ड्रीम प्रोजेक्ट, गडचिरोलीतील तीन हत्ती गुजरातला पाठवले, विरोधानंतर गुप्त पाठवणी

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here