या निष्कर्षापर्यंत अजून पोलीस पोहोचले नसून या प्रकरणाचा कसून तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करत आहेत. मुद्दसिका हारून पठाण (वय ९), अयान हारून पठाण (वय ७) असे मृत बहीण भावाचे नाव आहे. तर मोमीनबी हारून पठाण (वय ३५)( रा.डोंगरगाव, सिल्लोड) या महिलेचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी रात्री झोपण्यापूर्वी आईने दोघांना दूध प्यायला दिले आणि स्वत: देखील ते दुध प्यायली. दुधपिल्यानंतर काही वेळातच आईसह दोन्ही मुले जमिनीवर बेशुद्धवस्थेत पडले. पत्नी आणी मुले अचानक बेशुद्ध पडल्याचे दिसल्याने पती हारून पठाण यांनी दोन्ही मुले, पत्नी यांना तातडीने रुग्णालयात हलविले. तेव्हापासून तिघांवर उपचार सुरु होते.
उपचार सुरु असताना मुद्दसिका आणी अयान या दोघांचा मृत्यू झाला. तर आई मोमीनबी यांची प्रकृती गंभीर असून रुग्णाल्यात मृत्यूशी झुंज देत आहेत. दोघांच्या मृत्यू प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास आडे अधिक तपास करत आहेत. मुद्दसिका आणी अयान या दोन्ही मुलांचा विषारी दूध पिल्याने मृत्यू झाला. त्यांच्या आईवर उपचार सुरु आहेत. हा अपघात, विष प्रयोग किंवा समूहिक आत्महत्या आहे. हे स्पष्ट झालेले नाही.या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. सीताराम मेहेत्रे, पोलीस निरीक्षक, सिल्लोड, ग्रामीण