दिपक मनोहर काळे, संगीता अशोक शेळके, गोकुळ अशोक शेळके, अशोक शेळके आणि पोलिस नारायण दशरथ गायके अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच आरोपींची नावे आहेत.
मृत पावलेल्या सविता दीपक काळे या विवाहितेचा भाऊ श्यामसुंदर विश्वनाथ काकडे (वय ३६) यांनी दिलेली फिर्याद अशी की, शेजारी राहणाऱ्या संगीता या आरोपी सोबत पीडितेचा पती दीपक काळे याचे अनैतिक संबंध होते. त्यावरून संगीता ही नेहमी सविताशी वाद उकरून भांडण करायची. मारहाण करायची त्याला संगीताचा मुलगा व पती हे देखील साथ द्यायचे. सविताला शेजारी राहणाऱ्या संगीतानेच नाही तर संगीताच्या मुलाने व पतीने देखील मारहाण केली. हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होता.
अनेकवेळा सविताने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. मात्र, संगीता विरोधात तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात गेले असता शहर पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार नारायण गायके हे प्रकरणात संगीता व त्याच्या परिवाराचीच बाजू घेत होता. त्यामुळे अनेकवेळा तक्रार देऊनही कठोर कारवाई होत नव्हती. पती साथ देण्याऐवजी मारहाण करायचा. पोलीसांकडून देखील कारवाई होत नसल्याने अखेर वैतागून सविताने आत्मदहनासारखा टोकाचे पाऊल उचलले.
या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात विविध कलमाखली पाच जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा पती दीपक मनोहर काळे, शेजारी अशोक तुकाराम शेळके, गोकुळ अशोक शेळके या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.