ind vs pak : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी रंगणार आहे. हा सामना जिंकत भारताला अंतिम फेरीत जाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकता येणार आहे. त्यामुळे हा सामना भारतासाठी सर्वात महत्वाचा असेल. त्यामुळे या सामन्यासाठी संघात तीन मोठे बदल करण्यात येणार आहे. भारतीय संघात या सामन्यासाठी कोणाला संधी मिळू शकते, जाणून घ्या…

पहिला बदल…
भारतीय संघात पहिला बदल हा रवींद्र जडेजाच्या जागेसाठी होणार आहे. जडेजाला दुखापत झाल्यामुळे आता तो या स्पर्धेत खेळणार नाही हे निश्चित झाले आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात जडेजाच्या जागी होणार आहे. जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे, पण त्याला या सामन्यात खेळवण्याची शक्यता कमी आहे. जडेजाच्या जागी यावेळी हार्दिक पंड्याचे संघात पुनरागमन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दुसरा बदल…
भारतीय संघात दुरा बदल हा वेगवान गोलंदाजीमध्ये होणार आहे. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज अवेश हा चांगलाच महागडा ठरला होता. अवेश खानने गेल्या सामन्यात चार षटकांमध्ये ५३ धावा दिल्या होत्या. त्यामुळे आता या महत्वाच्या सामन्यात त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अवेशच्या जागी भारतीय संघात आता दीपक चहरला संधी देण्यात येऊ शकते. कारण दीपक हा एक चांगला स्विंग गोलंदाज आहे आणि तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे दीपक चहर हा संघासाठी एक चांगल्या पर्याय ठरू शकतो.
तिसरा बदल…
भारतीय संघातील तिसरा बदलही वेगवान गोलंदाजीमध्येच होऊ शकतो. गेल्या सामन्यात अवेश खानबरोबर अर्शदीप सिंगही महागडा ठरला होता. गेल्या सामन्यात अर्शदीपला अचूक आणि भेदक मारा करता आला नव्हता. त्यामुळे त्याला या सामन्यात संघाबाहेर करण्यात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात हा तिसरा बदल भारतीय संघात होऊ शकतो. भारतीय संघात अर्शदीपच्या जाही कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय महत्वाचा असेल. कारण भारतीय संघाबाहेर अजूनही आर. अश्विन आणि दीपक हुडा आहेत. अश्विनकडे चांगला अनुभव आहे तर दीपककडे चांगला फॉर्म आहे. त्यामुळे आता या सामन्यात या दोघांपैकी कोणाला संधी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.