मिचेल स्टार्कने केवळ १०२ सामन्यांमध्ये २०० बळी पूर्ण केले आहेत. जे सकलेन मुश्ताकपेक्षा दोन सामन्यांनी कमी आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली (११२ सामने) तिसरा, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज ऍलन डोनाल्ड (११७ सामने) चौथा आणि पाकिस्तान माजी कर्णधार वकार युनूस (118 सामने) सध्या या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. सर्वात कमी चेंडू खर्च करूनही २०० विकेट्स घेण्याच्या बाबतीत स्टार्कने सकलेनला मागे सोडले.
सर्वात कमी सामन्यांमध्ये २०० बळी (एकदिवसीय) :-
१०२ सामने, मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
१०४ सामने, सकलेन मुश्ताक (पाकिस्तान)
११२ सामने, ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया)
११७ सामने, अॅलन डोनाल्ड (दक्षिण आफ्रिका)
११८ सामने, वकार युनूस (पाकिस्तान)
सर्वात जलद २०० एकदिवसीय विकेट्स (बॉलद्वारे) :-
५२४०- मिचेल स्टार्क
५४५७- सकलेन मुश्ताक
५६४०- ब्रेट ली
५८८३- वकार युनूस
६१०२- शोएब अख्तर
एकाच विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा मिचेल स्टार्क हा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत, स्टार्कने १० सामन्यांमध्ये १८.५९ च्या प्रभावी सरासरीने २७ विकेट घेतल्या. या काळात स्टार्कने देशबांधव ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडला. २००७ मध्ये विंडीजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये मॅकग्राने २६ विकेट घेतल्या होत्या.
असा होता संपूर्ण सामना…
नाणेफेकनंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ३१ षटकांत अवघ्या १४१ धावांवर गारद झाला. डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ९४ आणि ग्लेन मॅक्सवेलने १९ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. झिम्बाब्वेकडून रायन बर्लेने तीन षटकांत १० धावा देत पाच बळी घेतले. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने ६६ चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठले. रेगिस चकाबवाने नाबाद ३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने तीन खेळाडूंना बाद केले.